राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र लक्ष्मण पवार यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार
राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र लक्ष्मण पवार यांना आधार फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठित राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राहुरीकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. अग्निशमन विभागात अत्यंत निष्ठेने व जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या राजेंद्र पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांप्रतीची त्यांची तत्परता, संकटात धावून जाण्याची वृत्ती आणि वेळप्रसंगी जीव धोक्यात घालण्याची तयारी हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.राजेंद्र पवार यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध दुर्घटनास्थळी स्वतः हजर राहून अनेकांची मदत केली आहे.नदीमध्ये बुडणाऱ्या नागरिकांना वेळेवर बाहेर काढणे.दुकानांमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणे शेतीमधील आगीच्या घटना हाताळून मोठ्या नुकसानापासून शेतकऱ्यांची सुटका करणे अशा असंख्य प्रसंगांत त्यांनी दाखवलेले धैर्य, तात्काळ निर्णयक्षमता आणि कार्यतत्परता पाहता त्यांना हा पुरस्कार मिळणे यो...