पोस्ट्स

राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र लक्ष्मण पवार यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार

इमेज
  राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार   राहुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र लक्ष्मण पवार यांना आधार फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठित राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राहुरीकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. अग्निशमन विभागात अत्यंत निष्ठेने व जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या राजेंद्र पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांप्रतीची त्यांची तत्परता, संकटात धावून जाण्याची वृत्ती आणि वेळप्रसंगी जीव धोक्यात घालण्याची तयारी हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.राजेंद्र पवार यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध दुर्घटनास्थळी स्वतः हजर राहून अनेकांची मदत केली आहे.नदीमध्ये बुडणाऱ्या नागरिकांना वेळेवर बाहेर काढणे.दुकानांमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणे शेतीमधील आगीच्या घटना हाताळून मोठ्या नुकसानापासून शेतकऱ्यांची सुटका करणे अशा असंख्य प्रसंगांत त्यांनी दाखवलेले धैर्य, तात्काळ निर्णयक्षमता आणि कार्यतत्परता पाहता त्यांना हा पुरस्कार मिळणे यो...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा आणि लसूण विषयावर 17 व्या राष्ट्रीय वार्षिक बैठकीचे उद्घाटन संपन्न

इमेज
  महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा आणि लसूण विषयावर 17 व्या राष्ट्रीय वार्षिक बैठकीचे उद्घाटन संपन्न कांदा व लसुन या पिकांच्या संशोधनामध्ये आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील 40% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी रंग, साईज व टिकवणक्षमता यावर अधिक काम करण्याची गरज आहे. आपल्याला काटेकोरपणे खते व औषधांचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प...

विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड येथील रोपवाटीकेस दोन तारांकन दर्जा प्राप्त

इमेज
  विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड येथील रोपवाटीकेस दोन तारांकन दर्जा प्राप्त   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गणेशखिंड, पुणे येथे असलेल्या विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डामार्फत दोन तारांकन दर्जा देऊन प्रमाणित करण्यात आले आहे. सदरच्या दोन तारांकन दर्जाची मान्यता ही २०२६-२७ व २०२७-२८ या दोन वर्षासाठी असणार आहे  गणेशखिंड संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन रोपवाटिकेत असलेल्या विविध फळझाडांचे मातृवृक्ष प्लॉट, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, पाणी देण्याच्या सुविधा, कलमे व रोपांची प्रत्यक्ष पाहणी करून दोन तारांकन दर्जाची मान्यता दिलेली आहे. रोपवाटिकेत असलेले मातृवृक्ष, मुलभूत सुविधा व कलमे रोपे यांची प्रत्यक्ष पाहणी करून राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रमाणित करणार्या समितीने समाधान व्यक्त केले. गणेशखिंड येथील रोपवाटिकेत फळझाडामध्ये विशेष करून आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, लिंबू व चिकू इ.फळझाडांची कलमे मोठ्या प्रमाणावर तयार करून शेतकर्यांना नियमितपणे पुरवठा केला जात आहे. स...

विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा वापर करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले

इमेज
  विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा वापर करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले            विद्यापीठातील संशोधनाचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे. आगामी काळामध्ये शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये संतुलित खतांचा वापर महत्त्वाचा असून त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यापीठ संतुलित खत वापर जागरूकता अभियान - २०२६ राबवत आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला भेटी प्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, पशु विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. र...

राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले

इमेज
  महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा  राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या विविध पिकांच्या 7 वाणांची निर्मिती , 3 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती व 59 तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये याद्वारे दर्जेदार कृषी शिक्षणाचे काम सुरू आहे. कृषी विस्तार कार्यामध्ये आपण विविध उपक्रम आयोजित करत असतो.  यावर्षी यामध्ये फुले कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केलेले आहे तसेच दहा जिल्ह्यांमध्ये मॉडेल व्हिलेज विकसित करण्याचा मानस आहे. विद्यापीठाने 6900 क्विंटल बियाणे उत्पादन करून बीज्योत्पादनाच्या उद्दिष्टामध्ये मोठी प्रगती साधलेली आहे. यावर्षी एल नीनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे संकेत आहेत त...

वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा

इमेज
  वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा   सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, मनापासून केलेली सेवा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये घेतलेल्या पुढाकारामुळे वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स – २०२६” या नामांकित डॉक्टरेट अवॉर्डसाठी निवड झाली आहे. निवड समितीमार्फत त्यांची निवड जाहीर होताच सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. वृषाली शेळके यांनी मागील काही वर्षांत वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून अनेक गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आरोग्यविषयक जनजागृती मोहीम, महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे, रुग्णसेवा, रक्तदान उपक्रम, गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचार व आर्थिक मदत अशा अनेक समाजहिताच्या कामांमध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक गोर-गरीब कुटुंबांना आधार मिळाला असून समाजातील दुर्बल घटकांना उभारी मिळावी यासाठी त्या सतत प्रेरणादायी कार्य करत आहेत. सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहित हेच जीवनाचे ध्येय मानणाऱ्या वृषाली शेळके यांच्या उप...

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

इमेज
मतदान करून हज यात्रेला प्रस्थान  राहुरीत प्रेरणादायी उदाहरण राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान २३ एप्रिल रोजी सकाळीच मतदानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत इस्माईल भाई सय्यद, रेहाना सय्यद, सरदार भाई सय्यद आणि आवेज सय्यद यांनी सकाळी सात वाजताच आपले मतदानाचा हक्क बजावून थेट हज यात्रेसाठी प्रस्थान केले. मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देत धार्मिक कर्तव्यालाही तितक्याच श्रद्धेने सुरुवात केल्यामुळे या कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे “मतदान प्रथम, नंतर इतर कार्य” हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला आहे. हज यात्रेसाठी रवाना होत असताना त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई शेख तसेच राहुरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आस्मा आरिफ शेख. गुड्डु सय्यद. वसीम सय्यद यांनी केले. विशेष म्हणजे, आस्मा शेख या इस्माईल सय्यद यांची कन्या असून आरिफ शेख हे त्यांचे जावई आहेत. कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कृत...