पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड

इमेज
  कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड  दि. 27 मार्च, रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विक्रम कड, डॉ. नारायण मुसमाडे, श्री.योगेश भिंगारदे, श्री.आप्पासाहेब चोपडे, संचालिका सौ.माधुरी औताडे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते. कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ही जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांची आर्थिक उन्नती साधण्यामध्ये मोठा वाटा आहे. या पतसंस्थेच्या वाटचालीमध्ये सर्व आजी व माजी संचालकांचा आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. नुकतीच झालेली पतसंस्थेच्या चेअरमन आ...

वनविभागाच्या कार्यालयातच वनमजुरांचे भांडण; अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ व मारहाणीची धमकी

इमेज
 वनविभागाच्या कार्यालयातच वनमजुरांचे भांडण; अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ व मारहाणीची धमकी वनविभागाच्या कार्यालयातच वनमजुरांचे भांडण; अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ व मारहाणीची धमकीव्य वस्थापन ढासळल्याची चर्चा वनअधिकारी सुनिल साळुंखे यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप    राहुरी टाऊन हद्दीतील वनविभागाच्या कार्यालयात आज दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने विभागातील शिस्तपालन आणि प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कार्यालयात कामानिमित्त उपस्थित असलेले वनमजूर गोरख मोरे आणि बाळासाहेब सिनारे यांच्यात कार्यालयीन कागदपत्रांवरून वाद झाला. हा किरकोळ वाद क्षणात तीव्र होत जाऊन दोघांमध्ये जोरदार बाचाबाची, शिवीगाळ आणि मारहाणीच्या धमक्यांपर्यंत पोहोचला. अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ; कॅबिनमध्ये घेऊन मारण्याची धमकी घडत असलेली परिस्थिती पाहून वाद शांत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी बाळु आटोळे यांनी हस्तक्षेप केला. परंतु त्यांच्या उपस्थितीतही दोन्ही वनमजूरांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब सिनारे सतत शिवीगाळ करत होते, तर गोरख मोरे यांनी “कॅबिनमध्ये घेऊन तुला मारू का अशी उघड धमकी दिल...

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

इमेज
  हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली,दि.२४/०३/२०२६ सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा लागू राहणार नाही. तसेच अशा धर्मांतरित व्यक्तींना SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संरक्षण मिळणार नाही. हा निर्णय एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देण्यात आला. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीचा राहात नाही. घटनात्मक तरतुदीनुसार, अनुसूचित जातीसाठी पात्रता केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांपुरती मर्यादित आहे. 1950 च्या राष्ट्रपती आदेशाचा आधार घेत न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला . न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, धर्मा...

रवांडा येथील सिंचन अभियंत्यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठात भेट

इमेज
  राहुरी विद्यापीठ, दि. 24 मार्च, 2026 जलसिंचनाचा काटेकोरपणे वापर होणे आवश्यक आहे अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी दिली    पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड व चोपन होत आहेत. या मानवनिर्मित समस्येमुळे पिकांची उत्पादन क्षमता कमी होत आहे. या समस्येच्या प्रतिबंधासाठी जलसिंचनाचा काटेकोरपणे वापर होणे आवश्यक असून या महत्वपूर्ण विषयाची माहिती घेण्यासाठी विद्यापीठात आलेल्या रवांडा देशातील सर्व सिंचन अभियंत्यांना विद्यापीठात झालेल्या संशोधनाचा निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.   राष्ट्रीय जल अकादमी, केंद्रीय जल आयोग, पुणे यांच्यातर्फे पाणी कार्यक्षम सिंचन प्रणालीचे नियोजन व रचना या विषयावर रवांडा सरकारच्या सिंचन अभियंत्यांसाठी तीन आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय जल अकादमी, केंद्रिय जल आयोग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रवांडा सरकारच्या सिंचन अभियंत्यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दोन दिवसांच्या अभ्य...

जेष्ठ पत्रकार विलासभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी (वय ८६ वर्ष) यांचे निधन

इमेज
  श्रद्धांजली – गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी (वय ८६ वर्ष) राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतीतील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी यांचे दि. २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक जीवनातील एक प्रेमळ, कर्तृत्ववान आणि संयमी व्यक्तीमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे . ८६ वर्षांच्या दीर्घ आणि समाधानी आयुष्यात त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळताना मूल्यांची जपणूक केली. प्रेम, संयम, आदर, आणि संस्कार यांचा वारसा त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला दिला. त्यांच्या व्यक्तिमत्वात ममत्व आणि कठोरतेचा सुंदर समतोल होता. समाजात आणि शेजारपाजारी त्यांनी कायमच प्रेम, शांतता आणि आपुलकीचे नाते राखले. त्यांच्यामागे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, भागीरथीबाई तनपुरे कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक बाळकृष्ण कुलकर्णी आणि अकोले येथील न्यायालयाचे अधीक्षक सचिन कुलकर्णी अशी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित संतती आहे. कुटुंबाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा राहिला असल...

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

इमेज
  राहुरी शहरातील नामांकित आणि राजकीय वारसा असणारा सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार राहुरीत सराफ दुकानावर सोन्याच्या साखळीच्या ३०० मिली वजनात ‘कट’ केल्याची चर्चा आहे राहुरी शहरातील एका नामांकित सोने-चांदीच्या सराफ दुकानावर एका वकिलाच्या सोन्याच्या साखळीच्या वजनात तब्बल ३०० मिलीग्रॅमचा कट केल्याचा आरोप समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील सेशन कोर्टात काम पाहणाऱ्या एका नामांकित वकिलांची सोन्याची साखळी रंगपंचमीच्या दिवशी तुटली होती. साखळी दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित वकील राहुरी शहरातील एका मोठ्या सराफ दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला साखळी तुटली असल्याचे सांगून ती जोडून देण्यास दिली. दुकानदाराने साखळी ताब्यात घेऊन काही वेळाने ती दुरुस्त करून परत दिली. मात्र काही दिवसांनी संबंधित वकिलांनी तीच साखळी सोने तारण ठेवण्यासाठी पुन्हा त्याच सराफ दुकानात दिली असता तिचे वजन तपासले असता तब्बल ३०० मिलीग्रॅमने कमी असल्याचे आढळून आले यामुळे वकिलांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ ही बाब लक्षात घेत पोलीस ठाणे गाठले दरम्यान, या प्रकरणानंतर काही ...

माझी राहुरी तहसील कार्यालयात मोठी ओळख आहे मी तुमचे तीस हजाराचे प्रकरण मंजुर करून देईल मला पैसे द्यावे लागतील

इमेज
  माझी राहुरी तहसील ऑफिस मध्ये ओळख आहे मी तुमचे काम करून देतो असे म्हणत मागितली लाच राहुरी नगरपरिषद येथील महिला व बालकल्याण विभागातील कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाबासाहेब किशोर राऊत यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई करून त्यांना रंगेहात अटक करण्यात आले  माझी राहुरी तहसील कार्यालयात मोठी ओळख आहे मी तुमचे तीस हजाराचे प्रकरण मंजुर करून देईल मला पैसे द्यावे लागतील असे म्हणत राहुरी शहरातील एका महिलेकडून शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ३०,००० रुपयांच्या मदतीसाठी बाबासाहेब राऊत यांनी १,००० रुपयांची लाच मागितली होती, तसेच ती स्वीकारण्याची तयारी दर्शवून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले होते. त्यानंतर त्या महिलेकडू तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योजनाबद्ध सापळा रचला आणि कारवाईदरम्यान बाबासाहेब राऊत यांनी १,००० रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहात पकडले या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 254/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 7(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपू...

राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील ग्रामदैवत मुळामाई देवी मंदिर.यात्रेचा पारंपरिक उत्साह यंदा अधिक रंगतदार होणार आहे

इमेज
 तमनर आखाडा येथे मुळामाई देवी यात्रेनिमित्त १ लाख ११ हजार किमतीची आणि कै. तुकाराम सखाराम तमनर. यांच्या स्मरणार्थ सौ. मनीषा आप्पासाहेब तमनर. यांच्याकडून प्रथम कुस्तीवर चांदीची गदा. अशी भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि मान्यवरांच्या दमदार उपस्थिती मध्ये होणार आहे  राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील ग्रामदैवत मुळामाई देवी मंदिर.यात्रेचा पारंपरिक उत्साह यंदा अधिक रंगतदार होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गावात खेळाडू, आयोजक, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिनांक २४ मार्च सायंकाळी चार वाजल्यानंतर या जंगी कुस्त्यांचा शुभारंभ होणार असून महाराष्ट्रातील नामांकित, दमदार आणि उत्कट मल्लांच्या उपस्थितीने तमनर आखाडा दणाणून जाणार आहे   हिंदू धर्म रक्षक राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष.सागरभैय्या बेग   महाराष्ट्र केसरी,गुलाबनाना बर्डे हे दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्वे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक वजनदार स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्थ आणि कुस्तीप...

राहुरीत सराफ दुकानावर सोन्याच्या साखळीच्या ३०० मिली वजनात ‘कट’ केल्याची चर्चा आहे

इमेज
 राहुरी शहरातील नामांकित सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार राहुरीत सराफ दुकानावर सोन्याच्या साखळीच्या ३०० मिली वजनात ‘कट’ केल्याची चर्चा आहे राहुरी शहरातील एका नामांकित सोने-चांदीच्या सराफ दुकानावर एका वकिलाच्या सोन्याच्या साखळीच्या वजनात तब्बल ३०० मिलीग्रॅमचा कट केल्याचा आरोप समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील सेशन कोर्टात काम पाहणाऱ्या एका नामांकित वकिलांची सोन्याची साखळी रंगपंचमीच्या दिवशी तुटली होती. साखळी दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित वकील राहुरी शहरातील एका मोठ्या सराफ दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला साखळी तुटली असल्याचे सांगून ती जोडून देण्यास दिली. दुकानदाराने साखळी ताब्यात घेऊन काही वेळाने ती दुरुस्त करून परत दिली. मात्र काही दिवसांनी संबंधित वकिलांनी तीच साखळी सोने तारण ठेवण्यासाठी पुन्हा त्याच सराफ दुकानात दिली असता तिचे वजन तपासले असता तब्बल ३०० मिलीग्रॅमने कमी असल्याचे आढळून आले यामुळे वकिलांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ ही बाब लक्षात घेत पोलीस ठाणे गाठले दरम्यान, या प्रकरणानंतर काही वेळातच संबंधित सोने-चांदी ...

संगमनेर तालुक्यातील रानखाम परिसरात एका मुलीवर मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, काल वडगाव पांन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे

इमेज
 संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील एका शाळेतून घरी जाताना अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला संगमनेर तालुक्यातील रानखाम परिसरात एका मुलीवर मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, काल वडगाव पांन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संबंधित विद्यार्थीनी संगमनेरमधील एका विद्यालयात शिक्षण घेत असून, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ऍसिड फेकले. या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे.  स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवलं असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात  आहे.त्यानंतर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध सुर...

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तांदूळवाडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे

इमेज
 राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन व भिमराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तांदूळवाडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सव कार्यक्रमा निमित्तमंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत अभिवादन सोहळा होणार आहे आणि ज्या महापुरुषाने या देशातील समता, बंधूता व न्याय या तत्वावर आधारित लोकशाही प्रदान करून या देशातील विषमता नष्ट केली. महिलांसाठी कामगारासाठी देशाच्या आर्थिक धोरणासाठी आपला देह झिजवून या देशातील प्रत्येक नागरीकास आपले हक्क आणि अधिकार प्रदान केले आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे या देशाला जगविख्यात भारतीय संविधान देऊन त्यांनी या देशातील अस्पृश्यता नष्ट करून या देशासाठी महान असे कार्य केलेले आहे.  अशा या महापुरुषाची जयंती साजरी करणे हे प्रत्येक भारतीय नागरीकाचे कर्तव्य आहे. यानिमित्त मंगळवार, दि. १४/४/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता अभिवादन केले जाईल. ११/३० वाजता मान्यवरांचे सत्कार केले जातील. दुपारी १२ वाजता अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप क...

राहुरी शहरातील नामांकित सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार

इमेज
 राहुरी शहरातील नामांकित सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार राहुरीत सराफ दुकानावर सोन्याच्या साखळीच्या ३०० मिली वजनात ‘कट’ केल्याची चर्चा आहे राहुरी शहरातील एका नामांकित सोने-चांदीच्या सराफ दुकानावर एका वकिलाच्या सोन्याच्या साखळीच्या वजनात तब्बल ३०० मिलीग्रॅमचा कट केल्याचा आरोप समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील सेशन कोर्टात काम पाहणाऱ्या एका नामांकित वकिलांची सोन्याची साखळी रंगपंचमीच्या दिवशी तुटली होती. साखळी दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित वकील राहुरी शहरातील एका मोठ्या सराफ दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला साखळी तुटली असल्याचे सांगून ती जोडून देण्यास दिली. दुकानदाराने साखळी ताब्यात घेऊन काही वेळाने ती दुरुस्त करून परत दिली. मात्र काही दिवसांनी संबंधित वकिलांनी तीच साखळी सोने तारण ठेवण्यासाठी पुन्हा त्याच सराफ दुकानात दिली असता तिचे वजन तपासले असता तब्बल ३०० मिलीग्रॅमने कमी असल्याचे आढळून आले यामुळे वकिलांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ ही बाब लक्षात घेत पोलीस ठाणे गाठले दरम्यान, या प्रकरणानंतर काही वेळातच संबंधित सोने-चांदी ...

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना डाळिंब पिकावरील किडींसंदर्भात मार्गदर्शन

इमेज
 कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना डाळिंब पिकावरील किडींसंदर्भात मार्गदर्शन              दिनांक १६ मार्च रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, येथील हॉर्टसॅप योजनेतील शास्त्रज्ञांनी मौजे महालक्ष्मी हिवरे, मांडेगव्हाण, देडगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे डाळिंब या पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले.  यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके योजनेतील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे, हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे, कृषी विभागाचे मांडेगव्हाणचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. ढोडदे, देडगावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दीपक कंकाळ व महालक्ष्मी हिवरेचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री.ऋषिकेश ढोकणे हे उपस्थित होते. या भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना खोड भुंगेरे/खोड किड व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले.         या भेटीसाठी हॉर्टसॅप प्रकल्प प्रमुख तथा वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवीं...

शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न

इमेज
 *शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न* आसाम येथील गुवाहाटी, खानापारा, ज्योती बीष्णू अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र येथून देशातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,640 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 22 वा हप्ता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण विद्यापीठात विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी करण्यात आले.   याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणूजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विवेक चिमोटे, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्व...

मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 39 वा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन

इमेज
 *मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 39 वा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन*   महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ रविवार दि. 15 मार्च, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. जिष्णू देव वर्मा हे उपस्थित असणार आहेत.  या पदवीप्रदान समारंभामध्ये मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्री. राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे आणि वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्...

युद्धाचा फटका: गॅसटंचाईमुळे अहिल्यानगरातील रिक्षाचालक त्रस्त

इमेज
 युद्धाचा फटका: गॅसटंचाईमुळे अहिल्यानगरातील रिक्षाचालक त्रस्त सध्या सुरू असलेल्या इराण–अमेरिका युद्धाचे पडसाद भारतासह जगभर उमटताना दिसत आहेत. या संघर्षामुळे गॅसचे आयात–निर्यात व्यवहार विस्कळीत झाले असून त्याचा थेट परिणाम अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यावसायिकांपासून रिक्षा चालकांपर्यंत सर्वांवर जाणवू लागला आहे. अहिल्यानगर परिसरातील बहुतेक रिक्षा सीएनजीवर धावतात. परंतु गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅसटंचाई तीव्र झाल्याने रिक्षा चालकांना पहाटेपासून गॅस स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक वेळा दिवसभर उभे राहूनही गॅस मिळत नाही, परिणामी त्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे काही रिक्षा चालकाणी कर्ज काढून रिक्षा व्यवसाय चालु केला आहे तर काही लोकांनी मुलांच्या शिक्षणा साठी कर्ज. काहींनी घरासाठी कर्ज घेतले आहे. आणि त्या कर्जाची फेड करणे हे फक्त रिक्षा व्यसायावर अवलंबुन आहे. आणि अशा परिस्थिती मध्ये गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे त्यामुळे कर्जाची फेड करणे अवघड झाले आहे  हॉ...

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील जायबा महाराज यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी डॉक्टर उत्तम कदम. आणि उपाध्यक्ष पदी अनिल घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

इमेज
 राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील सालाबाद प्रमाणे जायबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा नियोजन बैठक पार पडली. यावर्षी यात्रा कमिटी च्या अध्यक्षपदी. डॉक्टर उत्तम दादा कदम साहेब यांची आणि उपाध्यक्षपदी अनिल घोरपडे ( बल्ली ) खजिनदार केशव बेल्हेकर. आणि सचिवपदी संदीप कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडी सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे. उपसरपंच रावसाहेब पवार. आणि ग्रामसेवक महेश जंगम यांच्या उपस्थीती मध्ये करण्यात आल्या  बैठकीत नारळ वाढवून यात्रेच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला. बैठकीत गावातील मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करणे, विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे तसेच मारुती मंदिर, जायबा महाराज मंदिर व जैतुबा महाराज मंदिरांची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार करणे, भाविकांसाठी पाणपोईची व्यवस्था करणे, यात्रेत येणाऱ्या विविध दुकान व स्टॉलची मांडणी करणे तसेच रहाट पाळणेला ...

राहुरी तालुक्यातील शाळेच्या बस चालकाकडून नववीच्या विद्यार्थिनीची छेडछाड; गाडी मालक व संबंधित शैक्षणिक संस्था चालकांनाही सहआरोपी करा

इमेज
 *राहुरी तालुक्यातील शाळेच्या बस चालकाकडून नववीच्या विद्यार्थिनीची छेडछाड; गाडी मालक व संबंधित शैक्षणिक संस्था चालकांनाही सहआरोपी करा* राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे एका शाळेच्या बस चालकाकडून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो मानोरी गावचा रहिवासी असून टाकळीमिया येथील एका शाळेत बस चालक म्हणून कार्यरत होता. इतक्या जबाबदारीच्या पदावर असताना त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अशा प्रकारचे कृत्य केल्याने समाजात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे. सदर प्रकार समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या पालकांवरही मारहाण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुरी पोलीस प्रशासनाकडे ठाम मागणी करण्यात येते की, या प्रकरणात संबंधित आ...

राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निलंबित करून शिस्तभंगाच्या कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

इमेज
 राहुरी वार्ता   राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार कर्णा जाधव जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे समक्ष केली जिल्हाधिकारी यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन तक्रारीच्या चौकशी करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहेत   जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की राहुरी महसूल विभागाच्या निगडित व नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्याशी निगडित असलेल्या तक्रारीबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने संध्या दळवी यांनी माझी बदनामी झाली म्हणून वकिलामार्फत नोटीस दिली पोलिसांकडेही अदाखलपत्र केस दाखल केली न्यायालयातही दावा दाखल केला असे वेगवेगळे बेकायदेशीर कृत्य केले परंतु त्या शासनाच्या नोकर असून पब्लिक सर्वंट आहेत त्यामुळे त्यांना असे बेकायदेशीर कृत्य करता येत नाही कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयात धाव घे...

राहुरीत शिवजयंतीदिवशी पुन्हा वादग्रस्त घटना; बुवासिद्ध देव महाराज समाधीस्थळी वस्त्र पेटवल्याचा आरोप

इमेज
  राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घडलेल्या एका घटनेबाबत सकल हिंदू समाज, राहुरी यांनी प्रशासनाकडे निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, 6 मार्च रोजी दुपारी सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास शहरातील बुवासिद्ध देव महाराज यांच्या समाधीस्थळाच्या मागील बाजूस असलेले वस्त्र एका अल्पवयीन मुलाने पेटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याच दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. अशा वेळी ही घटना शहरात पसरली असती तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता होती, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित घडलेली एक वादग्रस्त घटना देखील रमजान महिन्यातच घडली होती. तसेच सध्याची ही घटना देखील रमजान महिन्यातच घडल्याने समाजात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडले नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची ...

सात्रळ येथील एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

इमेज
 राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप गंगाधर बालसाणे (वय २१, रा. सात्रळ, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीपने ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक संविता गंगाधर बालसाणे व इतरांनी त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण मेडिकल कॉलेज अँड प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी (ता. राहता ) येथे हलवले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ (बी.एन.एस. १९४ प्रमाणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोकाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्त, 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त

इमेज
 *प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्त, 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त* स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्त, 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त. याबाबत वृत्त असे की, सोमनाथ घारगे साहेब, पोलिस अधीक्षक, आयला नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आयला नगरमध्ये अवैध्य व्यवसायाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस अमलदार राहुल दवारके, शहिद शेख, फुरकान शेख, राहुल ढोके, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून, शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध्य धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केले. नमूद पथक दिनांक 3 मार्च 2026 रोजी शिर्डी पोलिस ठाणे हद्दीमध्ये अवैध्य धंद्याची माहिती काढत असताना, पथकास गुप्त बातमीदारांमार्फत ट्रक नंबर डब्ल्यू वी 25 एम 50 23 यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर-मनमाड ...

राहुरी शहरात वंचित बहुजन आघाडी ची बैठक संपन्न

इमेज
 राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे राहुरी शहरातील राहुरी येथील जेष्ठ नागरिक हॉलमध्ये आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, संघटन रचना बळकटीकरण, तसेच नवीन पदाधिकारी निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक तयारीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव मधुकर साळवे.जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ चोळके.तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव  जिल्हा संपर्क प्रमुख पिंटूनाना साळवे तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव. संदीप कोकाटे. पक्ष पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात राहुरी व आसपासच्या परिसरात जनसंपर्क मोहीम वाढवून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे ठरविले. तसेच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकीची सांगता पक्षविस्तार, संघटनशक्ती वृद्धी आणि निवडणूक तयारी ज...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

इमेज
 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेचाही सहभाग समोर आला असून तिचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुन मारुती ओहोळ यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, अहील्यानगर येथे जाऊन सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेत तक्रार मांडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी तात्काळ सोनई पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले व संबंधित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना केल्या. फिर्यादीनुसार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भाग्यश्री जाधव (गायधने ) (पूर्ण पत्ता - रा. श्रीरामपूर) या महिलेने फिर्यादींना वेळोवेळी फोन व संदेश पाठवून अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग केल्याचे सांगत तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

इमेज
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सोनई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेचाही सहभाग समोर आला असून तिचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुन मारुती ओहोळ यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, अहील्यानगर येथे जाऊन सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेत तक्रार मांडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी तात्काळ सोनई पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले व संबंधित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना केल्या. फिर्यादीनुसार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भाग्यश्री जाधव (गायधने ) (पूर्ण पत्ता - रा. श्रीरामपूर) या महिलेने फिर्यादींना वेळोवेळी फोन व संदेश पाठवून अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग केल्याचे सांगत तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर व ग...

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता

इमेज
  *डिग्रस गावातील महिला व ११ वर्षीय नातू बेपत्ता** राहुरी तालुक्यातील **डिग्रस** गावातून एक महिला आणि तिचा ११ वर्षीय नातू गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी **शारदा संपत पवार (वय ४७) व **गोकुळ बाळु पवार (वय ११) हे घरातून कुणाला काही न सांगता निघून गेले. दिवसभर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. दरम्यान, घरातील ज्येष्ठ सदस्य **संपत रघुनाथ पवार* हे नदीवर मासेमारीसाठी गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांच्या पत्नी शारदा पवार आणि नातू गोकुळ हे घरात नसल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी नातेवाईक आणि परिसरात शोधाशोध केली, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही.  **शारदा पवार यांचे वर्णन** * रंग : गोरा * उंची : अंदाजे ५ फूट * केस : काळे * अंगावरील पोशाख : हिरव्या रंगाची साडी **गोकुळ पवार यांचे वर्णन** * अंगावरील पोशाख : निळी जीन्स पॅन्ट व आकाशी रंगाचा शर्ट कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या दोघांविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे. राहुरी पोल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राजवाडा परिसरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठक संपन्न

इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राजवाडा परिसरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठकीत उत्सवाला भव्य स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी गतवर्षी साजऱ्या झालेल्या जयंती उत्सवाचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर या वर्षीचा उत्सव अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि सांस्कृतिक पद्धतीने व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर जयंती उत्सवासाठी विविध पदांवर सर्वानुमते निवडी करण्यात आल्या अध्यक्ष : विलास नाना साळवे उपाध्यक्ष : पिंटू नाना साळवे खजिनदार : दादू साळवे कार्याध्यक्ष : दिपक रामजी साळवे जयंती उत्सवा साठी सर्वानुमते निवड झालेले अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी सर्वांचे आभार मानत जयंती उत्सवाला समाजभिमुख, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूप देण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिपक रामजी साळवे यांनी उपस्थित केला.राजवाडा परिसरातील सर्व जेष्ठ आणि तरुणांनी यावर्षी देखील सर्व प्रकारची गटबाजी,...