राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या विविध पिकांच्या 7 वाणांची निर्मिती , 3 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती व 59 तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये याद्वारे दर्जेदार कृषी शिक्षणाचे काम सुरू आहे. कृषी विस्तार कार्यामध्ये आपण विविध उपक्रम आयोजित करत असतो. यावर्षी यामध्ये फुले कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केलेले आहे तसेच दहा जिल्ह्यांमध्ये मॉडेल व्हिलेज विकसित करण्याचा मानस आहे. विद्यापीठाने 6900 क्विंटल बियाणे उत्पादन करून बीज्योत्पादनाच्या उद्दिष्टामध्ये मोठी प्रगती साधलेली आहे. यावर्षी एल नीनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे संकेत आहेत त...