वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा

 वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स २०२६” साठी निवड सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा

 सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, मनापासून केलेली सेवा आणि जनजागृती उपक्रमांमध्ये घेतलेल्या पुढाकारामुळे वृषाली गणेश शेळके यांची “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क्स – २०२६” या नामांकित डॉक्टरेट अवॉर्डसाठी निवड झाली आहे. निवड समितीमार्फत त्यांची निवड जाहीर होताच सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.


वृषाली शेळके यांनी मागील काही वर्षांत वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून अनेक गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आरोग्यविषयक जनजागृती मोहीम, महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे, रुग्णसेवा, रक्तदान उपक्रम, गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचार व आर्थिक मदत अशा अनेक समाजहिताच्या कामांमध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.


त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक गोर-गरीब कुटुंबांना आधार मिळाला असून समाजातील दुर्बल घटकांना उभारी मिळावी यासाठी त्या सतत प्रेरणादायी कार्य करत आहेत. सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहित हेच जीवनाचे ध्येय मानणाऱ्या वृषाली शेळके यांच्या उपक्रमांमुळे परिसरात सकारात्मक बदलांची लाट निर्माण झाली आहे.
या सन्मानामुळे त्यांच्या सेवाकार्यात आणखी ऊर्जा भरली जाणार असून भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
वृषाली शेळके यांच्या या कामगिरीबद्दल सामाजिक संघटना, विविध प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक आणि प्रशासकीय स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर गौरवाची भावना पसरली आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

टिप्पण्या