मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान  राहुरीत प्रेरणादायी उदाहरण


राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान २३ एप्रिल रोजी सकाळीच मतदानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत इस्माईल भाई सय्यद, रेहाना सय्यद, सरदार भाई सय्यद आणि आवेज सय्यद यांनी सकाळी सात वाजताच आपले मतदानाचा हक्क बजावून थेट हज यात्रेसाठी प्रस्थान केले.
मतदानासारख्या लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देत धार्मिक कर्तव्यालाही तितक्याच श्रद्धेने सुरुवात केल्यामुळे या कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे “मतदान प्रथम, नंतर इतर कार्य” हा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला आहे.
हज यात्रेसाठी रवाना होत असताना त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई शेख तसेच राहुरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आस्मा आरिफ शेख. गुड्डु सय्यद. वसीम सय्यद यांनी केले. विशेष म्हणजे, आस्मा शेख या इस्माईल सय्यद यांची कन्या असून आरिफ शेख हे त्यांचे जावई आहेत. कुटुंबीयांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कृतीचे कौतुक करत, प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली. धार्मिक प्रवासासारख्या महत्त्वाच्या प्रसंगातही लोकशाही कर्तव्य पार पाडल्यामुळे सय्यद कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राहुरीत घडलेली ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, आगामी काळात अधिकाधिक नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा सकारात्मक संदेश देत आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता