महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त राहुरी राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळालाअनुसंगम शिंदे सर यांनी अथक परीश्रम घेतले .
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त राहुरी राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.
राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेत बाबासाहेब मन्तोडे प्रथम
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजन.साक्षी मस्के व पृथ्वीराज साठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक.महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत बाबासाहेब मन्तोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे होते. तर व्यासपीठावर रिपाइंचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे, अनुसंगम शिंदे सर.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड, सत्येंद्र तेलतुंबडे, पत्रकार आप्पासाहेब मकासरे, पलघडमल आदी उपस्थित होते. या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रंगनाथ धिगळे, तर तृतीय पारितोषिक कार्तिक झेंडे आणि राधाजी गायकवाड यांनी मिळवले. तसेच साक्षी मस्के आणि पृथ्वीराज साठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. काव्य स्पर्धेत राहुरी येथील सागर साळवे यांनी 'कणा' ही कविता सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मिथिलेश महेश साळवे या चिमुकल्याने सादर केलेल्या कवितेला विशेष दाद मिळाली. ८८ वर्षीय ज्येष्ठ कवी राधाजी गायकवाड यांनी '१४ एप्रिल'वर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रतीक शेजवळ यांनी 'भीमराव तुझा वारसा' ही कविता सादर करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. पैठण येथील अंकित वाघ यांच्या महापुरुषांच्या विचारांवरील कवितेला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यासोबतच समीक्षा कसबे, स्मिता साळवे, पायल कसबे, सुरेश वाघमारे आणि महेश पवार आदींनी आपल्या कवितांनी रंगत वाढवली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून होन, कातोरे आणि पलघडमल यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय भीम मित्र मंडळ राजवाडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे, खजिनदार दादू साळवे. राजेंद्र साळवे. सुरेश साळवे.संदीप साळवे. नविन साळवे. प्रतिक रुपटक्के.सोनु गुजर.अजय साळवे.राजेश साळवे.अविनाश पलघडमल.यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा