कोल्हारच्या प्रतिक बनसोडेची दैदिप्यमान कामगिरी; एमपीएससीत राज्यात १७ वा

 कोल्हारच्या प्रतिक बनसोडेची दैदिप्यमान कामगिरी; एमपीएससीत राज्यात १७ वा 


 कोल्हार खुर्द या ग्रामीण भागातील प्रतिक मनिषा संतोष बनसोडे याने अतुलनीय यशाला गवसणी घालत राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला आहे. त्याची नगर रचना अधिकारी श्रेणी १ या राजपत्रित अधिकारी पदी नियुक्ती मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

  ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत निकोप नि नक्कीच स्पर्धा करु शकतात हे प्रतिक च्या यशाने अधोरेखित केले आहे. जेमतेम खाजगी शिकवण मात्र जिद्द नि आत्मविश्वास, बरोबरच आई, वडिलांच्या समर्पक मार्गदर्शनामुळेच यशस्वी होवू शकलो ही त्याची प्रतिक्रीया नक्कीच बोलकी आहे. हरहुन्नरी असलेला प्रतिक अभ्यास करताना आत्मसात करण्याच्या वृत्तीमुळेच या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात या यशापर्यंत पोहोचल्याचे म्हणाला. त्याच्या या यशाबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघासह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार. NEWS 14 

टिप्पण्या