राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता
*डिग्रस गावातील महिला व ११ वर्षीय नातू बेपत्ता**
राहुरी तालुक्यातील **डिग्रस** गावातून एक महिला आणि तिचा ११ वर्षीय नातू गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी **शारदा संपत पवार (वय ४७) व **गोकुळ बाळु पवार (वय ११) हे घरातून कुणाला काही न सांगता निघून गेले. दिवसभर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, घरातील ज्येष्ठ सदस्य **संपत रघुनाथ पवार* हे नदीवर मासेमारीसाठी गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांच्या पत्नी शारदा पवार आणि नातू गोकुळ हे घरात नसल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी नातेवाईक आणि परिसरात शोधाशोध केली, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
**शारदा पवार यांचे वर्णन**
* रंग : गोरा
* उंची : अंदाजे ५ फूट
* केस : काळे
* अंगावरील पोशाख : हिरव्या रंगाची साडी
**गोकुळ पवार यांचे वर्णन**
* अंगावरील पोशाख : निळी जीन्स पॅन्ट व आकाशी रंगाचा शर्ट
कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या दोघांविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
संपर्क.९३२५३२८२३८

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा