राहुरी शहरात वंचित बहुजन आघाडी ची बैठक संपन्न
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे राहुरी शहरातील राहुरी येथील जेष्ठ नागरिक हॉलमध्ये आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, संघटन रचना बळकटीकरण, तसेच नवीन पदाधिकारी निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक तयारीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत प्रमुख उपस्थिती
जिल्हा महासचिव मधुकर साळवे.जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ चोळके.तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव
जिल्हा संपर्क प्रमुख पिंटूनाना साळवे तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव. संदीप कोकाटे.
पक्ष पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात राहुरी व आसपासच्या परिसरात जनसंपर्क मोहीम वाढवून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे ठरविले. तसेच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
बैठकीची सांगता पक्षविस्तार, संघटनशक्ती वृद्धी आणि निवडणूक तयारी जलद गतीने सुरू ठेवण्याच्या निर्धाराने झाली.
‼️राहुरी वार्ता ‼️
‼️दिपक साळवे. योगेश पवार ‼️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा