राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील जायबा महाराज यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी डॉक्टर उत्तम कदम. आणि उपाध्यक्ष पदी अनिल घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील सालाबाद प्रमाणे जायबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा नियोजन बैठक पार पडली. यावर्षी यात्रा कमिटी च्या अध्यक्षपदी. डॉक्टर उत्तम दादा कदम साहेब यांची आणि उपाध्यक्षपदी अनिल घोरपडे ( बल्ली ) खजिनदार केशव बेल्हेकर. आणि सचिवपदी संदीप कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडी सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे. उपसरपंच रावसाहेब पवार. आणि ग्रामसेवक महेश जंगम यांच्या उपस्थीती मध्ये करण्यात आल्या
बैठकीत नारळ वाढवून यात्रेच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला. बैठकीत गावातील मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करणे, विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे तसेच मारुती मंदिर, जायबा महाराज मंदिर व जैतुबा महाराज मंदिरांची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार करणे, भाविकांसाठी पाणपोईची व्यवस्था करणे, यात्रेत येणाऱ्या विविध दुकान व स्टॉलची मांडणी करणे तसेच रहाट पाळणेला वण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.यावेळी
युवानेते हेमंत ( पप्पु ) मकासरे. युवाकार्यकर्ते राजुभाऊ बेल्हेकर.संदीप ओहोळ. मोहन काळे.राजकुमार भिंगारदे.दत्तात्रय गावडे. योगेश सुधाकर भिंगारदे.जालिंदर बेल्हेकर, सचिन भिंगारदे, कुंडलिक गावडे व प्रकाश तारडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब वाघमोडे हे होते आणि
अनिल शिंदे, केशव बेल्हेकर, अशोक बेल्हेकर, बाळकृष्ण गावडे, साईनाथ बेल्हेकर.शिवाजी झीने,जगन्नाथ पवार, सुभाष बेल्हेकर, राजू बेल्हेकर, गोरख देशमुख, बापूसाहेब गिरगुणे, चंद्रकांत टेके, मोहन काळे, आसिफ पठाण, मन्सूर पठाण, रवींद्र गिरगुणे अमोल बेल्हेकर, अनिस सय्यद, संदीप कोकाटे, सोमनाथ पवार, राजू पवार, संतोष राऊत, छोटू देशमुख, नाना थेटे, तान्हाजी पवार, सोपान गावडे,विष्णू पवार,बापु गिरगुणे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.पत्रकार योगेश पवार.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा