युद्धाचा फटका: गॅसटंचाईमुळे अहिल्यानगरातील रिक्षाचालक त्रस्त

 युद्धाचा फटका: गॅसटंचाईमुळे अहिल्यानगरातील रिक्षाचालक त्रस्त


सध्या सुरू असलेल्या इराण–अमेरिका युद्धाचे पडसाद भारतासह जगभर उमटताना दिसत आहेत. या संघर्षामुळे गॅसचे आयात–निर्यात व्यवहार विस्कळीत झाले असून त्याचा थेट परिणाम अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यावसायिकांपासून रिक्षा चालकांपर्यंत सर्वांवर जाणवू लागला आहे.



अहिल्यानगर परिसरातील बहुतेक रिक्षा सीएनजीवर धावतात. परंतु गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅसटंचाई तीव्र झाल्याने रिक्षा चालकांना पहाटेपासून गॅस स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक वेळा दिवसभर उभे राहूनही गॅस मिळत नाही, परिणामी त्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.


कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे काही रिक्षा चालकाणी कर्ज काढून रिक्षा व्यवसाय चालु केला आहे तर काही लोकांनी मुलांच्या शिक्षणा साठी कर्ज. काहींनी घरासाठी कर्ज घेतले आहे. आणि त्या कर्जाची फेड करणे हे फक्त रिक्षा व्यसायावर अवलंबुन आहे. आणि अशा परिस्थिती मध्ये गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे त्यामुळे कर्जाची फेड करणे अवघड झाले आहे 

हॉटेल व्यावसायिकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्याने स्वयंपाकात विलंब, ग्राहकांची गैरसोय आणि व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी केंद्र सरकारने त्वरीत हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच युद्धजन्य परिस्थितीत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.*राहुरी वार्ता* दिपक साळवे सह योगेश पवार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता