कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना डाळिंब पिकावरील किडींसंदर्भात मार्गदर्शन

 कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना डाळिंब पिकावरील किडींसंदर्भात मार्गदर्शन

           


 दिनांक १६ मार्च रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, येथील हॉर्टसॅप योजनेतील शास्त्रज्ञांनी मौजे महालक्ष्मी हिवरे, मांडेगव्हाण, देडगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे डाळिंब या पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले. 


यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके योजनेतील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे, हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे, कृषी विभागाचे मांडेगव्हाणचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. ढोडदे, देडगावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दीपक कंकाळ व महालक्ष्मी हिवरेचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री.ऋषिकेश ढोकणे हे उपस्थित होते. या भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना खोड भुंगेरे/खोड किड व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले.

        या भेटीसाठी हॉर्टसॅप प्रकल्प प्रमुख तथा वनस्पती रोगशास्त्र व अणूजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय कोळसे तसेच अ.भा.स. कोरडवाहू फळपीके संशोधन प्रकल्पाचे रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.दिपक साळवे सह योगेश पवार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता