राहुरी शहरातील नामांकित सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार
राहुरी शहरातील नामांकित सराफ दुकानात ३०० मिली सोन्याचा गैरप्रकार
राहुरीत सराफ दुकानावर सोन्याच्या साखळीच्या ३०० मिली वजनात ‘कट’ केल्याची चर्चा आहे राहुरी शहरातील एका नामांकित सोने-चांदीच्या सराफ दुकानावर एका वकिलाच्या सोन्याच्या साखळीच्या वजनात तब्बल ३०० मिलीग्रॅमचा कट केल्याचा आरोप समोर आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील सेशन कोर्टात काम पाहणाऱ्या एका नामांकित वकिलांची सोन्याची साखळी रंगपंचमीच्या दिवशी तुटली होती. साखळी दुरुस्त करून घेण्यासाठी संबंधित वकील राहुरी शहरातील एका मोठ्या सराफ दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला साखळी तुटली असल्याचे सांगून ती जोडून देण्यास दिली. दुकानदाराने साखळी ताब्यात घेऊन काही वेळाने ती दुरुस्त करून परत दिली.
मात्र काही दिवसांनी संबंधित वकिलांनी तीच साखळी सोने तारण ठेवण्यासाठी पुन्हा त्याच सराफ दुकानात दिली असता तिचे वजन तपासले असता तब्बल ३०० मिलीग्रॅमने कमी असल्याचे आढळून आले यामुळे वकिलांना संशय आला आणि त्यांनी तत्काळ ही बाब लक्षात घेत पोलीस ठाणे गाठले
दरम्यान, या प्रकरणानंतर काही वेळातच संबंधित सोने-चांदी व्यापारी आणि वकील दोघेही पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्याचे समोर आले. वकिलांचे समाधान झाले असले तरी शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
नागरिकांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की, जर एका वकिलालाच असा अनुभव आला असेल तर सामान्य नागरिक, विशेषतः महिलांना यापूर्वी किती वेळा अशा प्रकारे फसवले गेले असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित सराफ दुकानाच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे राहुरी शहरातील सराफ व्यवसायावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांनी सोने-चांदी व्यवहार करताना सावध राहावे असे आवाहन काही जाणकारांकडून करण्यात येत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा