संगमनेर तालुक्यातील रानखाम परिसरात एका मुलीवर मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, काल वडगाव पांन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे

 संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील एका शाळेतून घरी जाताना अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला



संगमनेर तालुक्यातील रानखाम परिसरात एका मुलीवर मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, काल वडगाव पांन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संबंधित विद्यार्थीनी संगमनेरमधील एका विद्यालयात शिक्षण घेत असून, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ऍसिड फेकले. या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे.



 स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवलं असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात

 आहे.त्यानंतर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध सुरु आहे.हल्ला झालेल्या मुलीवर वैद्यकीय उपचार लोणी येथील PMT हॉस्पिटल, येथे करण्यात येत आहेत. सध्या मुलीची काय परिस्थिती आहे? ती किती टक्के भाजली आहे आणि तिची सध्या काय स्थिती आहे. ही सर्व माहिती पोलीस घेत आहे त्याचबरोबर आरोपीच्या शोध घेण्यासाठी.CCTV मधून कॅमेरा चेक करण्यात येत आहेत. आरोपी कोणत्या वाहनावर आला होता याचा देखील शोध घेण्यात येत आहे असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता