माझी राहुरी तहसील कार्यालयात मोठी ओळख आहे मी तुमचे तीस हजाराचे प्रकरण मंजुर करून देईल मला पैसे द्यावे लागतील
माझी राहुरी तहसील ऑफिस मध्ये ओळख आहे मी तुमचे काम करून देतो असे म्हणत मागितली लाच
राहुरी नगरपरिषद येथील महिला व बालकल्याण विभागातील कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाबासाहेब किशोर राऊत यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई करून त्यांना रंगेहात अटक करण्यात आले
माझी राहुरी तहसील कार्यालयात मोठी ओळख आहे मी तुमचे तीस हजाराचे प्रकरण मंजुर करून देईल मला पैसे द्यावे लागतील असे म्हणत राहुरी शहरातील एका महिलेकडून शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ३०,००० रुपयांच्या मदतीसाठी बाबासाहेब राऊत यांनी १,००० रुपयांची लाच मागितली होती, तसेच ती स्वीकारण्याची तयारी दर्शवून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले होते.
त्यानंतर त्या महिलेकडू तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योजनाबद्ध सापळा रचला आणि कारवाईदरम्यान बाबासाहेब राऊत यांनी १,००० रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहात पकडले
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 254/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 7(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया कडू देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली. कारवाईनंतर तपास प्रक्रिया सुरू असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत महिलांना व नागरिकांना शासनाचा लाभ मिळत असतो परंतु काही नागरिक अशिक्षित असल्यामुळे त्यांना प्रकरण कसे मंजुर होईल याची माहिती नसते त्यामुळे बहुतेक नागरिक नगरपरिषद कार्यालयात विचारपूस करण्यासाठी जात असतात आणि असे भ्रष्ट अधिकारी त्यांना लाच मागून काम करण्याचे आश्वासन देतात
स्थानिक प्रशासनात वाढणाऱ्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.दिपक साळवे सह योगेश पवार न्युज 14



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा