जेष्ठ पत्रकार विलासभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी (वय ८६ वर्ष) यांचे निधन

 श्रद्धांजली – गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी (वय ८६ वर्ष)



राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतीतील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व गं. भा. प्रमिलाआई वासुदेव कुलकर्णी यांचे दि. २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक जीवनातील एक प्रेमळ, कर्तृत्ववान आणि संयमी व्यक्तीमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे
.

८६ वर्षांच्या दीर्घ आणि समाधानी आयुष्यात त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळताना मूल्यांची जपणूक केली. प्रेम, संयम, आदर, आणि संस्कार यांचा वारसा त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला दिला. त्यांच्या व्यक्तिमत्वात ममत्व आणि कठोरतेचा सुंदर समतोल होता. समाजात आणि शेजारपाजारी त्यांनी कायमच प्रेम, शांतता आणि आपुलकीचे नाते राखले.

त्यांच्यामागे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, भागीरथीबाई तनपुरे कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक बाळकृष्ण कुलकर्णी आणि अकोले येथील न्यायालयाचे अधीक्षक सचिन कुलकर्णी अशी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित संतती आहे. कुटुंबाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा राहिला असल्याचे सर्वजण गौरवाने सांगतात.

त्यांच्या निधनाने गुरुकुल वसाहत तसेच राहुरी परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेमळ, संस्कारी, आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या प्रमिलाआईंची कमी भरून न निघणारी आहे. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

भावपूर्ण श्रद्धांजली..!

शोकाकुल राहुरी तालुका सर्व पत्रकार वर्ग 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता