राहुरी तालुक्यातील शाळेच्या बस चालकाकडून नववीच्या विद्यार्थिनीची छेडछाड; गाडी मालक व संबंधित शैक्षणिक संस्था चालकांनाही सहआरोपी करा

 *राहुरी तालुक्यातील शाळेच्या बस चालकाकडून नववीच्या विद्यार्थिनीची छेडछाड; गाडी मालक व संबंधित शैक्षणिक संस्था चालकांनाही सहआरोपी करा*



राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे एका शाळेच्या बस चालकाकडून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो मानोरी गावचा रहिवासी असून टाकळीमिया येथील एका शाळेत बस चालक म्हणून कार्यरत होता. इतक्या जबाबदारीच्या पदावर असताना त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अशा प्रकारचे कृत्य केल्याने समाजात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.


सदर प्रकार समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या पालकांवरही मारहाण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुरी पोलीस प्रशासनाकडे ठाम मागणी करण्यात येते की, या प्रकरणात संबंधित आरोपीवर POCSO (पोस्को) कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.

तसेच आरोपीने काही मुलींचे व्हिडिओ काढल्याचा संशय व्यक्त होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जर तसे आढळून आले तर त्याबाबतही गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

यासोबतच अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचा व्यक्ती शाळेच्या बसवर चालक म्हणून कसा ठेवण्यात आला? शाळा प्रशासनाने त्याची कोणतीही पार्श्वभूमी तपासणी केली होती का? याचीही सखोल चौकशी करून गाडी मालक तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेचे चालक / व्यवस्थापन यांनाही सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.

त्याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते, उपजिल्हाअध्यक्ष राहुल पिले , विद्यार्थी सेना जिल्हा संघटक सागर माने, तालुकाध्यक्ष मनोज जाधव, वाहतुक सेना तालुकाध्यक्ष राजू आडगळे , विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश गायकवाड, युवराज कोकाटे, प्रनेश चव्हाण , महेश घाडगे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.. राहुरी वार्ता. दिपक साळवे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता