सात्रळ येथील एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


 राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप गंगाधर बालसाणे (वय २१, रा. सात्रळ, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीपने ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक संविता गंगाधर बालसाणे व इतरांनी त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण मेडिकल कॉलेज अँड प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी (ता. राहता ) येथे हलवले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची माहिती लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ (बी.एन.एस. १९४ प्रमाणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोकाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता