राहुरीत शिवजयंतीदिवशी पुन्हा वादग्रस्त घटना; बुवासिद्ध देव महाराज समाधीस्थळी वस्त्र पेटवल्याचा आरोप
राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घडलेल्या एका घटनेबाबत सकल हिंदू समाज, राहुरी यांनी प्रशासनाकडे निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, 6 मार्च रोजी दुपारी सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास शहरातील बुवासिद्ध देव महाराज यांच्या समाधीस्थळाच्या मागील बाजूस असलेले वस्त्र एका अल्पवयीन मुलाने पेटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्याच दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. अशा वेळी ही घटना शहरात पसरली असती तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता होती, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित घडलेली एक वादग्रस्त घटना देखील रमजान महिन्यातच घडली होती. तसेच सध्याची ही घटना देखील रमजान महिन्यातच घडल्याने समाजात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडले नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाने प्रशासनाकडे केली आहे.
तसेच मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासून संबंधित अल्पवयीन मुलासह त्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या सर्वांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ही घटना पुन्हा घडू नये आणि सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, राहुरी यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. हे निवेदन राहुरीचे तहसीलदार डॉ. अमित पवार तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले.
यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळीसत्यम दहिवाळकर.सागर गायकवाड.श्रेयश सत्रे.साहील सुरवसे. सुनिल नाना पवार.आदित्य भागवत.ओम तनपुरे. रुद्राक्ष झिने कार्तिक तेवर.सुरज गायकवाड. निखिल नारद.अभि तनपुरे इत्यादी हजर होते. दिपक साळवे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा