राहुरी दुध भेसळ प्रकरणी संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि त्याच्या मोबाईल ची सी डी आर तपासणी होणार का असा प्रश्न

राहुरी दुध भेसळ प्रकरणी संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि त्याच्या मोबाईल ची सी डी आर तपासणी होणार का असा प्रश्न 

 


दोन दिवसांपूर्वी दूध भेसळ प्रकरणात तांदूळवाडीचा संतोष धसाळ याला त्याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते आता पुन्हा मंगळवारी 5,30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संतोष धसाळच्या घराची झाडाझडती घेतली या झाडा झाडतीमध्ये पोलिसांना काय पुरावे मिळाले हे समजू शकले नाही परंतु आरडगाव येथील अक्षय निकम या युवकाला पोलीस पथकाने ताब्यात घेतल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात संतोष धसाळ चा पाठीराखा नेमका कोण आहे हे त्याच्या मोबाईल च्या सी डी आर तपासणी नंतर समोर येईल. ही तपासणी होईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चा आहे 

अक्षय निकम हा मुलगा काही वर्षापासून संतोष धसाळच्या घरी कामाला आहे त्यामुळे संतोष धसाळच्या काही काळया कारनाम्यात अक्षय निकम सहकार्य करीत असल्याचा संशय यातून निर्माण होत आहे संतोष धसाळ यास नेवासा फाटा येथील दूध भेसळखोराशी लागेबादे असल्याची चर्चा समोर आली होती या दोघात आर्थिक देवाणघेवणीच्या व्यवहार झाल्याची चर्चा ही रंगत आहे परंतु आता संतोष धसाळ कडे काम करणाऱ्या अक्षय निकम पोलिसांच्या जाळ्यात गेल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसत आहे संतोष धसाळची काही वर्षांपूर्वीची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती परंतु तो काही वर्षातच इतका कोट्याधीश झालाच कसा? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.


याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर प्रकरण अत्यंत कर्तव्यदक्षपणे हाताळत आहेत यात कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कर्तव्य पार पाडत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. या सर्व विषयाचा विचार करता संतोष धसाळ हा दूध भेसळखोरीत आरोपी म्हणून सिद्ध तर होणार नाही ना? अशी ही चर्चा तालुक्याच्या पूर्व भागात चवीने होत आहे अक्षय निकम पोलिसांनी ताब्यात घेतल्याने निकम कडून आणखी काही गूढ रहस्य बाहेर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दिपक साळवे सह योगेश पवार. NEWS 14

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता