राहुरी राजवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी

 राहुरी राजवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी*


राहुरी तालुक्यातील राजवाडा येथील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता राजवाडा समाज मंदिर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या

 


निमित्ताने सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध शिवव्याख्याते हसन सय्यद यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असून समाजातील अंधश्रद्धा, शिक्षण, समता आणि सुधारणा याविषयी त्यांचे मार्गदर्शन सर्वांना चिंतन देणारे ठरले.

कार्यक्रमाला जयभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष विलास नाना साळवे किरणभाऊ साळवे दादु साळवे भूषण साळवे अजय साळवे (ग्राममहसूल अधिकारी) विवेक सगळगिळे अजिंक्य शिंदे अमोल साळवे (ग्रामसेवक)अनुप साळवे डॉ. देवेंद्र शिंदे तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजात समानता, बंधुभाव आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले हे कार्यक्रम समाजप्रबोधनाची दिशा दाखवणारे ठरले असून उपस्थित नागरिकांकडून कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले. 

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राहुरी शहरातील तो नामांकित आणि राजकीय वारसा असलेला नेमका कोण

मतदान करून हज यात्रेला प्रस्थान राहुरीत प्रेरणादायी उदाहरण

राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील ४७ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता