डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त"भीम काव्य"स्पर्धा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त"भीम काव्य"स्पर्धा
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त जय भीम मित्र मंडळाने राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केल्या आहेत,
शुक्रवार दिनांक १० एप्रिल ला राजवाडा या ठिकाणी भीम काव्य स्पर्धा सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रुपये २१०१/- सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक रुपये 1501 सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक १००१ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,उत्तेजनार्थ दोन पारितोषिके रुपये ५०० सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.सर्व कवींना जयभीम मित्रमंडळाच्या वतीने अल्पोपहार व चहा दिला जाणार आहे.या स्पर्धेसाठी नामांकित कवी देवदत्त सूर्यवंशी उपस्थित राहणार असून स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.कातोरे(बेलवंडी)प्रा. होन(टाकळीमिया) कवयित्री मनीषा पटेकर कोल्हार हे राहणार आहेत.
स्पर्धेसाठी नाममात्र नोंदणी फी रुपये ५० ठेवलेली असून स्पर्धेत कवींची संख्या ६० एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे.ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले नाव व फी श्री अनुसंगम शिंदे सरांकडे (9503959957) देऊन नोंदणी करावी.
सादर करण्यात येणारी कविता स्वरचित व स्वलिखित असावी. ऐनवेळी नोंदणी केली जाणार नाही,त्यामुळे लवकरात-लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जयभीम मित्र मंडळाने केले आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार. NEWS14

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा