राहुरी शहरातील पोलीस स्टेशन येथे १३ एप्रिल रोजी झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात मा.सोमनाथ घार्गे साहेब जिल्हा पोलिस प्रमुख अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले
राहुरी शहरातील पोलीस स्टेशन येथे १३ एप्रिल रोजी झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात मा.सोमनाथ घार्गे साहेब जिल्हा पोलिस प्रमुख अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले राहुरी पोलिस स्टेशनला सामाजिक कार्यकर्त्या यमुना भालेराव यांचेवर फिर्यादी दाखल करणारा गंगाधर विधाटे यांच्या मुलांनी रमाई आवास घरकुल घोटाळा केल्याचे प्रकरण उघड केले याचा मनात राग धरून त्यांच्यावर व त्यांच्या मुलावर बनाव करून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे समजले
पोलिस स्टेशनच्या आवारात महिलेचे ब्लाऊज फाडून विनयभंग होणे हे हास्यास्पद असून असा खोटा गुन्हा त्यांच्या मुलावर दाखल केला आहे.यमुनाताई भालेराव या एक प्रामाणिक सामजिक कार्यकत्या आहेत त्या पोलिस स्टेशनच्या दक्षता समितीवरही उत्कृष्टकाम करतात गेली २५ ते ३० वर्षापासून त्याचे सामाजिक कार्य सुरु. आहे ताहाराबाद येथील रमाई आवास घरकुल घोटाळा उघड न करण्यासाठी यमुनाताई भालेराव यांना पोलिस स्टेशन ठाणे अंमलदार कक्षातच हातवारे करून व अश्लिल भाशा वापरली ते योग्यच आहे का? दुपारी ३ ते ७ च्या दरम्यान शेतामध्ये मुलगा वांगे तोडीत असताना त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडला असुन त्याचे घटने दरम्यानचे टावर लोकेशन CDR डंब डेटा प्रत्यक्षात तपासले तर हा गुन्हा कसा बनाव करून दाखल केला हे सिद्ध होऊ शकते या संदर्भात पोलिस अधिक्षकांना
भीमराज सेना.राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन.बहुजन भिम पँथर.
भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन अशा अनेक संघटनानी निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत त्या निवेदनात या प्रकरणाची सत्यता उघड करण्यात यावी. तसेच फिर्यादी गंगाधर विधाटे व त्याची पत्नी यांनी संगनमत करुन सामाजिक कार्यकर्त्या यमुनाताई भालेराव व त्यांचा मुलगा मयूर यांचेवर कसे खंडणी व विनयभंगाचे बनाव करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत या गुन्ह्याचा उलगडा करून सामाजिक कार्य करणाऱ्या यमुनाताई भालेराव यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन करण्यात आले.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा